प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे : धुळे (Dhule News) शहरात दहशतवादी (Terrorist Attack) हल्ल्याच्या मॉक ड्रिल (mock drill) दरम्यान दहशतवादी म्हणून आलेल्या एका व्यक्तीला पालकांच्या रोषाचा सामना करावा लागल्याचा प्रकार समोर आला आहे. दहशतवादी हल्ला झाल्यावर कशी प्रतिक्रिया द्यायची याबद्दलचं प्रात्यक्षिक धुळे शहरातील स्वामीनारायण मंदिरामध्ये करण्यात आलं होतं. यावेळेस प्रात्यक्षिकामुळे मंदिरात उपस्थित असलेले नागरिक चांगलेच घाबरले होते. लहान मुलांनी रडण्यास आणि जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केली. हे पाहून एका संतप्त पालकाने थेट दहशतवादी बनून आलेल्या व्यक्तीला चांगलाच चोप दिला. विशेष म्हणजे प्रात्यक्षिक सुरू असतानाच पालकाने त्या तरुणाल चोप देण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रात्यक्षिक सुरू असताना दहशतवाद्याला प्रत्यक्ष मारहाण होत असल्याचं पाहून सुरुवातीला पोलिसांच्याही काही लक्षात येईना. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत संतप्त पालकाला बाजूला केले आणि हे मॉक ड्रिल पूर्ण केले. पालकांच्या या संतप्त प्रतिक्रियेमुळे मात्र उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे पोलिसांनी त्या पालकाची समजूत घालून त्याला बाजूला नेले. मात्र तोवर दहशतवादी बनलेल्या व्यक्तीचे मार खाल्याने कान चांगलेच लाल झाले होते.


पोलिसांनी काय सांगितले?


"आज आम्ही, स्वामीनारायण मंदिराशेजारी मॉक ड्रिल केले. या मॉक ड्रिलचा उद्देष हाच आहे की अशी परिस्थिती आली तर लोकांनी काय करायला हवं आणि पोलीस यंत्रणा त्यावर काय करते याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यामध्ये आम्हाला थोडे यश मिळाले आहे. आमची पोलीस यंत्रणा सतर्क आहे," अशी माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांनी दिली.


 



मंत्रालयात दहशतवादी हल्ल्याचा फोन


मुंबई पुन्हा एकदा हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे. एका कॉलरने मुंबईत दहशतवादी हल्ल्याची धमकी दिल्याने मुंबई पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षात हा धमकीचा कॉल आल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर पोलिसांनी  तपास करत फोन करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत दहशतवादी हल्ल्याची धमकी देणाऱ्या आरोपीची ओळख पटली असून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपीला अटक करण्यात आली असून त्याचे नाव प्रकाश खिमानी आहे. फोन करणारा हा मुंबईतील कांदिवली भागातील रहिवासी असून त्याला तेथून अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मुंबई पोलीस हा फोन करण्यामागची कारणे जाणून घेण्यासाठी आरोपीची चौकशी करत आहेत. मात्र, फोन करणाऱ्याने दारूच्या नशेत फोन केल्याचा संशय पोलिसांना आहे.