कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड : गळफास लागून एका चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दु:खद घटना पिंपरी-चिंचवडच्या (pimpri chinchwad) रुपीनगर परिसरात घडली आहे. सुमैय्या शकील शेख असं असं आठ वर्षांच्या या मुलीचं नाव आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुमैय्याचे आई-वडिल बाजारात खरेदीसाठी गेले होते. घरात सुमैय्या आणि तिची बहिण दोघीच होत्या. यावेळी खेळण्यासाठी त्यांनी ओढणीचा झोपळा बनवला.


झोपाळा खेळताना अचानक सुमैय्याच्या गळ्याला ओढणीचा फास बसला. सुमैय्याच्या बहिणीनं तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. आसपासच्या नागरिकांनीही धाव घेत सुमैय्याला वाचवण्याचे प्रयत्न केले. सुमैय्याला तात्काळ उपाचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारापूर्वीच तिचा दुर्देवी मृत्यू झाला. सुमैय्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होतेय.