मुंबई : राज्यातील भाजप सरकारनं आपल्याला अर्बन नक्षल आणि एल्गार परिषद प्रकऱणात गोवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केला आहे. यावरून हे संपूर्ण प्रकरणच खोटं असून सामाजिक कार्यकर्त्यांना गजाआड टाकण्याचा डाव होता हे सिद्ध होतं असल्याचा दावाही त्यांनी केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याप्रकरणी पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्याला फोनवरून मदत करु असं सांगितलं होतं. आणि आपण जेव्हा त्यांना खटला भरा असं सांगितलं, त्यानंतर आपल्याला कधीच फोन आला नसल्याचं सिंहांनी सांगितलं. महाराष्ट्र सरकारनं उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू करण्याची मागणी दिग्विजय सिंहांनी केलीय. 



भीमा कोरेगाव दंगली प्रकरणी प्रश्नी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. यावेळी पोलिसांच्या कारवाईबाबत देखील संशय व्यक्त करण्यात आले होते. विधानसभेतही या प्रश्नावरुन गदारोळ झाला होता. अर्बन नक्षलच्या नावाखआली जी नावे गोवण्यात आली ती राज्य सरकारच्या दबावाखाली करण्यात आल्याचा आरोप फडणवीस सरकारवर होत आहे.