झेंडा लावण्यावरुन दोन गटात राडा; पोलिसांवरही दगडफेक, एक जखमी
Flag Hoisting Rada : अचलपूरमध्ये झेंडा लावण्यावरुन दोन गटात वाद निर्माण झाला. त्यानंतर तुफान राडा पाहायला मिळाला.
अमरावती : Flag Hoisting Rada : अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमध्ये झेंडा लावण्यावरुन दोन गटात वाद निर्माण झाला. त्यानंतर तुफान राडा पाहायला मिळाला. दोन गटातील वादाचं रुपांतर दगडफेकीत झाले. दगडफेकीनंतर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तर अचलपूर, परतवाडा शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
अमरावतीच्या अचलपूर शहरात दुल्हा गेटवर झेंडा लावण्यावरून दोन गटात वाद झाला. या वादानंतर मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे अचलपूर आणि परतवाडा शहरात 144 कलम लागू करण्यात आले आहे. आता जमावबंदी असल्याने गटाने फिरण्यावर बंदी असणार आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. संतप्त जमावानं पोलिसांच्या दिशेनंही दगडफेक केली. या दगडफेकीत एक पोलीस कर्मचारी जखमी असल्याची माहिती आहे. सध्या दोन्ही शहरात तणावपूर्ण शांतता आहे.