महाविकास आघाडीत धुसफूस, यशोमती ठाकूर यांनी सुनावले
महाविकास आघाडीत धुसफूस उघड झाली आहे. सरकार स्थिर राहावे, असे वाटत असेल तर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका टाळा, असे काँग्रेस कार्याध्यक्ष यशोमती ठाकूर यांनी सुनावले आहे.
अमरावती : महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) धुसफूस उघड झाली आहे. सरकार स्थिर राहावे, असे वाटत असेल तर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका टाळा, असे काँग्रेस (Congress) कार्याध्यक्ष यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी सुनावले आहे.
काँग्रेसचे नेतृत्व स्थिर आहे, महाविकास आघाडी सरकार हा त्याच निर्णयक्षमतेचा परिपाक आहे असे त्यांनी म्हटले आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार (Sharad Pawar) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वावर टीका केली होती. त्यानंतर यशोमती ठाकूर यांनी नाव न घेता हा इशारा दिला आहे. सरकार स्थिर राहावे, असं वाटत असेल तर काँग्रेस नेतृत्वावरील टीका टाळा, असे ठाकूर यांनी म्हटले आहे.
CM दौऱ्याआधी ट्विट, नंतर बोलण्यास नकार
आघाडीमधील काही नेत्यांच्या काही मुलाखती लेख माझ्या निदर्शनास आले आहेत. काँग्रेसची कार्याध्यक्षा म्हणून मला आघाडीतील मित्रपक्षांना सांगू इच्छिते की, हे सरकार स्थिर राहावे असं वाटत असेल तर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणे टाळावे, असे त्यांनी म्हटले होते. या ट्विटनंतर महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला. त्याचवेळी गाडीचा काच बंद करताना समृद्धी महामार्ग आता हा बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ओळखला जाईल, असे त्या म्हणाल्या.
काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्याबाबत एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांच्यात सातत्य कमी दिसते, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे जाहीर मुलखातीच्या कार्यक्रमात बोलतले होते. त्यानंतर यशोमती ठाकूर यांनी ट्विट केले. दरम्यान, राष्ट्रवादीकडून याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. शरद पवार यांचे भाष्य हे वडिलकीच्या नात्याचे आहे. त्यादृष्टीकोणातून त्यांनी पाहावे, असे मत राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तापसे
दरम्यान, गेल्या महिन्यात जळगाव जिल्हा दौऱ्यात असताना राज्य सरकार चांगले काम चालत असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे कॅप्टन म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे खूप उत्तम प्रकारे नेतृत्व करत आहेत. ते आमच्या तीनही पक्षांमध्ये भांडणे होऊच देत नाहीत. त्यामुळे विरोधी पक्ष असलेल्या भाजपला पुढची चार वर्षे विरोधी पक्ष म्हणूनच काम करावे लागणार आहे, असा चिमटा यशोमती ठाकूर यांनी काढला होता.