Maharashtra Ministers Bungalow: महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपानंतर आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. खातेवाटपानंतर जास्त विलंब न लावता दोन दिवसांत मंत्रालयातील दालन आणि बंगले वाटप करण्यात आले आहेत. बंगले व दालन वाटपावरून महायुतीत नाराजी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. विश्वासात न घेता दालन, बंगले वाटप करण्यात आल्याने काही मंत्री नाराज आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी महायुतीच्या मंत्र्यांना दालनापाठोपाठ बंगल्याचेही वाटप करण्यात आले आहे. महायुती सरकारमधील सर्व मंत्र्यांना बंगल्याचं वाटप करण्यात आलं आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्तार ,खातेवाटप  वाद मिटल्यानंतर आता बंगले व दालन वाटपावरून महायुतीत नाराजी असल्याचे सूत्रांनी दिली आहे. काही मंत्री यांना बंगले न मिळाल्याने नाराज आहेत, तर काही मंत्री वास्तू प्रमाणे दालन मिळाली नाही म्हणून नाराज असल्याचे समोर आले आहे. काही बंगले अनलकी आहेत त्या बंगल्यात जाण्यास काही मंत्री तयार नाहीत. ही नाराजी जेष्ठ नेत्याकडे बोलून दाखवली असल्यामुळं येणाऱ्या काळात बंगले व दालन अदलाबदल होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 


विश्वासात न घेता दालन, बंगले वाटप करण्यात आल्याने काही मंत्री नाराज आहेत. अनेक मंत्री वास्तुशास्त्राप्रमाणे दिशा बघून दालन व बंगले घेत असतात. पण वाटपाचे थेट आदेश आल्याने मंत्री गडबडून गेले. मंत्रालयात सर्व मंत्र्यांना सामावून घेण्याएवढी दालने उपलब्ध नसल्याने तीन राज्यमंत्र्यांची कार्यालये विधान भवनात थाटण्यात आली आहेत. 


कोणत्या नेत्यांना कोणता बंगला


मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक बंगला देण्यात आला आहे. तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पर्णकुटी बंगला देण्यात आला आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे राज्याचे महसूल मंत्री आहेत. तर पंकजा मुंडे या पर्यावरण मंत्री आहेत. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना ज्ञानेश्वरी बंगला देण्यात आला आहे. तर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिवगिरी बंगल्याचं वाटप करण्यात आलं आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना रॉयलस्टोन बंगला देण्यात आला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांना (क-८) विशाळगड बंगला देण्यात आला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांना ब-१ सिंहगड देण्यात आला आहे.