बीड : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने, बीडमधील जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. नरहरी शेळके यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. शेळके यांच्यासोबत कारकून फडही एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. बीडमधील राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित यांच्याविरोधात खंडणी मागितल्याची तक्रार शेळके यांच्याविरोधात दाखल केली होती. यानंतर शेळके यांना निलंबित करण्याची घोषणा विधानपरिषदेत करण्यात आली.शेळके यांनी आमदार पंडित यांच्याविरोधात खंडणीखोरी आणि अॅट्रोसिटी, तर त्यांचे स्वीय सहाय्यक जालिंदर राऊत यांनी धमकावल्याची तक्रार दाखल केली होती. 


2008 मध्येही शेळकेंची चौकशी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेळके १ लाख १५ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकले. विशेष म्हणजे 2008 मध्येही शेळकेंची लाचलुचपत खात्याकडून खुली चौकशी झाली होती.


किंमत अंदाजे २ कोटी रुपये


शेळके यांच्या घरात १.२ किलो चांदी, २२ ग्रॅम सोनं, एक बँक लॉकर आणि १६ लाखांचे एफडी मिळाल्या आहेत. औरंगाबाद शहरातील सर्वात आलिशान परिसर म्हणून ओळख असलेल्या एन १ भागात नरहरी शेळके यांचा बंगला आहे. त्याची किंमत अंदाजे २ कोटी रुपये आहे.