सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेमडिसिवीरची मागणी वाढली आहे. कोरोना संसर्गीत रुग्णांना डॉक्टरांकडून रेमडिसिवीरचा डोस दिला जातो. कोरोनात हे इंजेक्शन प्रभावी ठरत असते. परंतु तुम्हाला माहितीये का की रेमडिसिवीर औषध बनवण्यासाठीचा कच्चा माल आपल्या महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातच तयार होतो?  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 कोरोनावर प्रभावी ठरत असलेल्या या रेमेडिसीवीर इंजेक्शनसाठी लागणारा काही कच्चा माल सोलापुरात तयार होतोय. सोलापुरातील बालाजी अमाईन्स या कंपनीत रेमेडिसिवीरसाठी लागणारे दोन सॉलवन्ट आणि एक कच्चा माल तयार होतोय. 
 
 या इंजेक्शनसाठी जवळपास 27 घटकांची गरज असते. त्यापैकी ट्रायइथाईल अमाईन (टीईफ), डायमिथाईल फार्मामाईड (डीएमएफ), असिटोनायट्रायल या तीन प्रमुख कच्चा मालाची निर्मिती बालाजी अमाईन्स करत आहे.
 
 रेमेडिसिवरचा कच्चा माल तयार करण्यासाठी प्रामुख्याने इथेनॉलचा वापर होतो. मिथेनॉल अमोनिया, इथेनॉल अमोनिया, अँसिटीक अँसिड आणि ऑक्सिजनचा वापर या कच्चा मालाच्या निर्मितीसाठी केला जातो. यातील काही माल हा महाराष्टातूनच मागवला जातो.


 मात्र काही माल हा परदेशातून मागवावा लागत असल्याची माहिती बालाजी अमाईन्सचे प्रमुख राम रेड्डी यांनी दिली. विशेष म्हणजे रेमेडिसिवर साठी लागणारा डायमिथाईल फार्मामाईड हे अमाईन्स संपूर्ण देशात केवळ सोलापुरात तयार होते. 
 
 त्यामुळे रेमेडिसिवर तयार करणाऱ्या सर्व कंपन्याना बालाजी अमाईन्स हा कच्चा माल पुरवत आहे. दरम्यान रेमेडिसिवरची मागणी पाहता बालाजी अमाईन्सचे विस्तारिकरण देखील करण्यात येणार आहे.