पुणे : ससून हॉस्पिटलमधील डॉक्टर्स तसेच इतर कर्मचाऱ्यांनी डॉक्टर चंदनवाले यांच्या बदलीला विरोध दर्शवला आहे. चंदनवाले यांच्या समर्थनार्थ सगळे प्रशासकीय इमारती बाहेर जमले होते. ससूनमध्ये मुळातच अत्यवस्थ असलेले रुग्ण दाखल केले जातात. त्यामुळे ससूनमध्ये कोरोना ग्रस्तांना मृत्युदर जास्त असल्याच्या आरोपात तथ्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. डॉ चंदनवाले यांच्या वरील इतर आरोपांची रितसर चौकशी व्हावी आणि त्यानंतर योग्य ती कारवाई व्हावी. मात्र अशा पद्धतीनं यांची तडकाफडकी बदली करणे योग्य नसल्याचं ससूनचे निवासी डॉक्टर्स कर्मचाऱ्यांनी म्हटलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची अचानक बदली करण्यात आल्याने डॉक्टर आणि कर्मचारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत. डॉ. चंदनवाले यांच्या तडकाफडकी बदलीला मार्डने विरोध केला आहे.


ससून रुग्णालयात ३८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्याचा मृत्यूदर देशात सर्वाधिक आहे. त्यामुळेच डॉ. चंदनवाले यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. डॉ. चंदनवाले यांच्या बदलीनंतर उपअधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला आहे.


ससून रुग्णालय कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 50 बेडचा आयसीयू, 100 बेड आयसोलेशन, 13 हजार लिटर ऑक्सिजन पाईपलाईन आणि 300 टनाच्या एसीची व्यवस्था करण्यात आली आहे.