मांजा गळ्यात अडकल्यानं डॉक्टर तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
डॉक्टर तरुणीचा दुर्दैवी अंत
पिंपरी-चिंचवड : नाशिक फाटा उड्डाणपुलावर मांजा गळ्यात अडकल्यानं डॉक्टर तरुणीचा दुर्दैवी अंत झाला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. कृपाली निकम असं मृत 26 वर्षीय तरुणीचं नाव आहे. नाशिक फाटा पुलावरून भोसरीकडे जात असताना मांजा गळ्यात अडकला आणि त्यातच मृत्यू झाला. भोसरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
गळा चिरला गेल्याने मृत्यू
दुचाकीवरून जात असताना या तरुणीचा पतंगाच्या मांज्याने गळा कापला गेल्याने तिचा मृत्यू झाला. कृपाली निकम असं मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे. कृपाली ही मूळची जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावची रहिवासी आहे. कृपालीच्या गळ्याभोवती मांजा गुंडाळला गेल्याने तिचा गळा चिरला गेला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने कृपालीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सर्रासपणे मांजाची विक्री
एका नागरिकाने कृपालीला रुग्णालयात दाखल केलं पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. बंदी असूनही पंतगाचा मांजा सर्रासपणे विकला जात आहे हे यावरुन पुन्हा एकदा समोर आलं आहे.