औरंगाबाद : रस्त्यावर स्वस्तात बिर्याणी खात असाल तर सावधान कारण तुम्ही खात असलेल्या बिर्याणीत कुत्र्याचं मांस असू शकते. हे ऐकून धक्का बसेल मात्र हे खरं आहे. अॅनिमल वेल्फेअर मंडळाच्या सदस्यांनी याबाबत धक्कादायक वास्तव समोर आणलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रन चित्रपटातील कव्वा बिर्याणीचा संवाद गाजला होता. मात्र यातील काहीसं सत्य आता समोर येत आहे. बाजारात कव्वा नाही तर कुत्ता बिर्याणीची विक्री होत असल्याच धक्कादायक वास्तव समोर आलंय.


केंद्र सरकारच्या अॅनिमल वेल्फेअर मंडळाच्या सदस्यांनी हे वास्तव समोर आणलंय. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी नाल्यात किंवा कच-यात कुत्र्याचे कापलेले शीर आढळून येत आहे, मात्र त्याचे धड आढळून येत नाही.


रस्त्यावर मिळणाऱ्या स्वस्त बिर्याणीत कुत्र्याचं मास सर्रास वापरलं जात असल्यानं हे प्रकार होत असल्यायचं धक्कादायक वास्तव अधिकार्यांनी समोर आणलं. यात कुत्र्यासोबत मांजरीचे देखील मास वापरलं जात असल्याच अधिकार्यांचं म्हणणं आहे.


रस्त्यावर बिर्याणी खाणारा वर्ग हा गरीब असतो. चांगल्या हॉटेल मध्ये बिर्याणी खाता येत नसल्याने तो रस्त्यावर मिळणारी ही बिर्याणी खातो. मात्र या बिर्याणीत जर कुत्र्याच मांस मिश्रण केलेले असेल तर हे आपल्या स्वास्थासाठी हानिकारक आहे.


औरंगाबादेत मुकुंदवाडी, चिखलठाणा आणि पाडेगाव या भागांमध्ये कुत्र्यांचे कापलेले शीर आढळून आले. त्यामुळे स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी समितीसमोर हा प्रश्न उपस्थित केला. समितीच्या सदस्यांनी यातील वास्तव सांगितल्यावर आता पालिका रस्त्यावरील सर्व बिर्याणीच्या गाड्यांची तपासणी होणार आहे.


अॅनिमल वेल्फेअर मंडळाच्या सदस्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. कुठेही बिर्याणी खाताना त्यातील मांसाची खात्री करुन घ्या. या गंभीर प्रकाराची अन्न व औषधी प्रशासन दखल घेत काय कारवाई करतं ते पहायचं.