भटक्या कुत्र्यानं दीड वर्षांच्या चिमुरड्याला फरफटत नेलं
पनवेल तालुक्यातल्या पडघा गावात सध्या कुत्र्यांची प्रचंड दहशत आहे.
स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : पनवेल तालुक्यातल्या पडघा गावात सध्या कुत्र्यांची प्रचंड दहशत आहे.
पनवेल तालुक्यातल्या पडघा गावात सध्या कुत्र्यांच्या टोळ्याच्या टोळ्या भटकत असतात... या कुत्र्यांनी गावातल्या अवघ्या दीड वर्षांच्या आयानला खेळत असताना पायाला पकडून खेचून नेलं... आयनच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झालीय... तर चार वर्षांच्या साध्यराणीवरही कुत्र्यांनी हल्ला केला. त्यात तिच्या डोळ्याला इजा झालीय.
आत्तापर्यंत कुत्र्यांनी लहान-मोठ्या अशा बारा जणांवर हल्ला केलाय. हे कुत्रे कुणीतरी बाहेरुन आणून सोडलेत, असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. येत्या 15 दिवसात 232 जणांना श्वानदंश झाल्याची पनवेल रुग्णालयात नोंद आहे.
'झी 24 तास'नं याबाबत महापालिका आरोग्य विभागाला माहिती दिली. त्यानंतर पडघ्यामध्ये श्वानपथक पाठवण्याच्या हालचाली महापालिकेनं सुरू केल्या आहेत.