मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक : नाशिक शहरात गेल्या काही दिवसापासून मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढलाय. कुत्र्याच्या दहशतीमुळे लहान मुले आणि त्यांच्या पालक धास्तावालेत.. महापालिका कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्यात अपयशी ठरल्याने कुत्र्यांच्या दहशतीला उतारा म्हणून नागरिकांनी एक भन्नाट शक्कल लढवलीये..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक शहरातील सिडको, पवननगर, खुटवडनगर या भागात गेलात तर प्रत्येक घराबाहेर अशा लाल रंगाच्या बाटल्या हमखास दिसतील.. मोकाट कुत्र्यांपासून बचाव करण्यासाठी या रहिवाशांनी लढवलेली ही शक्कल. लाल रंगाची बाटली घराबाहेर ठेवल्यानं त्याला घाबरुन कुत्रे दारापर्यंत येत नाही असा या रहिवाशांचा समज आहे. 


हा शोध कोणी लावला याचं उत्तर मात्र कोणाकडेच नाही. या लाल रंगाच्या बाटल्यांना कुत्रे घाबरत नसल्याचा दावा प्राणीमित्रांनी केलाय.. ही केवळ अंधश्रद्धा असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. 


सिडको आणि पवननगर भागात कामगारवस्ती आहे. या भागात श्वानदंशाचं प्रमाण अधिक आहे.. तक्रार करुन पालिका या कुत्र्यांवर कारवाई करत नाही आणि कुत्र्यांना मारलं तर प्राणीमित्रांच्या तक्रारीवरुन नागरिकांवर कारवाई होते. त्यामुळे कुत्र्यांचा उपद्रव टाळण्यासाठी स्थानिकांना हा लालबाटलीचा मार्गच सोईस्कर वाटतोय.