आतिष भोईल, झी मीडिया, डोंबिवली : डोंबिवलीत (Dombivli) एक धक्कादायक घटना समोर आलीय. इथे बापाने आपल्याच 9 वर्षांच्या मुलीची गळा दाबून हत्या (Father Kills Daughter) केली.  या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. डोंबिवलीतल्या मानपाडा इथंही घटना घडली असून पोलिसांनी आरोपील बापाला अटक केली आहे. पोलिसात (Manapada Police) तपातास आरोपी बापाने मुलीच्या हत्येचं दिलेलं कारण ऐकून पोलिसही हादरले.  आरोपी बापाचं नाव मनोजकुमार असं असून तो डोंबिवलतल्या मानपाडा इथं आपल्या कुटुंबासह राहातो. मनोज कुमारला चार मुली आहेत. याली एक मुलगी 9 वर्षांची होती आणि ती गतीमंद होती. तसंच ती सारखी आजारी असायची.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलीला ऐकायला आणि बोलायला येत नव्हतं. तिच्या आजारपणाला मनोज कुमार हा कंटाळला होता. त्यामुळे तो नैराश्यातही होता. यातून त्याने मुलीची गळा दाबून हत्या केली. या घटनेची माहिती मनोज कुमार याच्या पत्नीनेच पोलिसांना दिली. माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्ठळी धाव घेत आरोपी मनोज कुमारला अटक केली. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 


कल्याणमध्ये ट्रक चालकाची हत्या
दरम्यन, कल्याणमध्ये आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कल्याणमधल्या दुर्गाडी चौक परिसरात एका ट्रक चालकाची हत्या करण्यात आली. मृत ट्रक चालकाचं नाव भोला कुमार असं होतं. भोलावर अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला करत त्याची हत्या केल्याचं उघड झालं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत भोला कुमार याचा मृतदेह ताब्यात घेत तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवलाय. दरम्यान या भोला कुमारचे हत्या कोणत्या उद्देशाने करण्यात आली आणि हत्या कोणी केली याचा पोलीस आता शोध घेत आहेत.


सासऱ्याने केली सुनेची हत्या
दुसऱ्या एका घटनेत चुलत सासऱ्याने सुनेची कुऱ्हाडीने वार करत निर्घृण हत्या केली. आरोपीने सासूवरही हल्ला केला यात ती गंभीर जखमी झाली आहे, गोंदिवया शहातील दवनिवडा इथली ही घटना आहे. जखमी सासूवर गोंदियातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृत महिलेचं नाव सुनीता ठाकरे असं आहे तर जखमी सासूचं नाव रिमन ठाकरे असं आहे. 


गोंदिया तालुक्या अंतर्गत येणाऱ्या देवरी- धापेवाडा गावात शुल्लक कारणावरून चुलत सासऱ्याने सुने सोबत वाद घालत कुऱ्हाडीने वार करून हत्या केली तर वाचविण्या करिता आलेल्या सासूबाई यांच्या कानावर कुऱ्हाडीने वार केल्याने त्या देखील गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ५० वर्षीय आरोपी प्रीतम ठाकरे याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने मृत महिलेचे पती आणि सासरे हे घरी नसताना हा हल्ला केला आहे