डोंबिवली अमुदान कंपनीतील स्फोट नेमका कशामुळे झाला? आरोपीच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं कारण
Amudan Company Blast: न्यायालयात हे प्रकरण सुरु असून यात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत.
Amudan Company Blast: डोंबिवली एमआयडीसी परिसरात स्फोट झाल्यानंतर संपूर्ण शहर हादरले. अमुदान कंपनीतील स्फोट झाल्याचे काही वेळाने समोर आले. यानंतर या घटनेत दोषी आढळलेल्यांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयात हे प्रकरण सुरु असून यात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत.
कल्याण न्यायालयाने डोंबिवली एमआयडीसीतील स्फोट प्रकरणी कंपनी मालक मलय मेहता याला 29 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे
मलय याच्या अमुदान या केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट होऊन 13 लोकांचा बळी गेला. या विरोधात या कंपनीचा मालक मलय मेहताला अटक करून आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले.
त्यावेळी त्याला 29 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.या आधी ठाणे गुन्हे शाखेने त्याला घाटकोपर येथून ताब्यात घेतले होते. दरम्यान आता पोलिस कोठडी पोलीस या स्फोट प्रकरणी काय माहिती गोळा करतात हे पाहावे लागेल.
अमुदान कंपनीतील स्फोटप्रकरणी आरोपींच्या वकीलांनी कोर्टात युक्तिवाद केलाय.अमुदान कंपनीतील स्फोट हा वाढत्या उष्णतेमुळे झाला, असे त्यांनी म्हटलंय. या प्रकरणात मध्यस्थी याचिका करणारे प्रियेश सिंघ यांनी माहिती दिलीय.