Dombivli MIDC Blast CCTV Video :  डोंबिवली एमआयडीसीमध्ये अमुदान कंपनीत दुपारी 2 ते 2.30 वाजता भीषण स्फोट झाला. यास्फाटामुळे डोंबिवलीकर पुरते भयभीत झालेत. या स्फोटाची तीव्रता एवढी होती ही सुमारे 2 ते 3 किमी अंतरावर याचे हादरे बसलेत. परिसरातील गाड्या आणि घरांच्या खिडक्यांच्या काचांचा खच पडलाय. रहिवासी भागात असलेल्या या धोकादायक केमिकल कंपन्या म्हणजे नागरिकांसाठी रोजचच मरण झालंय. कधी काय होईल याचा नेम नाहीय. वारंवार होणाऱ्या या घटनांमुळ डोंबिवलीतील नागरिक मात्र पुरते भदरून गेलेत. अशातच आता स्फोट झाला तेव्हा शेजारील एका दुकानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोंबिवली एमआयडीची मधील स्फोटाची भीषणता परिसरातील झालेल्या नुकसानावरून लक्षात येते. स्फोट झाला त्या कंपनीपासून जवळच असलेल्या एका फर्निचरच्या दुकानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. डोंबिवली एमआयडीसी परिसरातील स्फोट इतका भीषण होता की 200 ते 300 मीटर परिसरातील इमारतींच्या काचा फुटल्या.



40 जणांवर उपचार सुरु


तब्बल 48 पेक्षा अधिक कामगारांना गंभीर दुखापत झाली आहे. सध्या डोंबिवलीतील एम्स रुग्णालयात 40 जणांवर उपचार सुरु आहे. तर नेपच्यून रुग्णालयात 15 जणांवर उपचार सुरु आहेत. मंत्री उदय सामंत यांनी डोंबिवली MIDC येथील दुर्घटनास्थळी भेट देऊन मदतकार्याचा आढावा घेतला. या दुर्घटनेत जखमी झालेल्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकारतर्फे करण्यात येणार आहे. या दुर्घटनेची संपूर्ण चौकशी केली जाईल, अशी माहितीही मंत्री सामंत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.


मुख्यमंत्री म्हणतात कारवाई होणार


डोंबिवली एमआयडीसी विभागातील अंबर केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दल तसेच वैद्यकीय पथक दाखल झाले असून बचावकार्य वेगाने सुरू आहे. सध्या बचावकार्याला प्राथमिकता देण्यात आली असून त्यानंतर या दुर्घटनेला जे कुणी जबाबदार असतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.