Dombivli News : मस्करीची कुस्करी अशी म्हण आपण नेहमीच ऐकतो. या म्हणीला खरी ठरवणारी धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे.  सहकार्यासोबत मस्करी करणं एका महिलेच्या जीवावर बेतल आहे. मस्करी करताना तिस-या मजल्यावरून पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नगीनादेवीराम असं या मृत महिलेचे नाव आहे.  या घटनेचा सीसीटीव्ही सध्या व्हायरल होत आहे. या प्रकरणी डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. 


नेमकं काय घडलं?


डोंबिवली एमआयडीसी येथील ग्लोब स्टेट इमारतीत ही धक्कादायक घटना घडली आहे. मृत नगीनादेवीराम ही साफसफाईचे काम करायची.  साफसफाईचे काम संपल्यावर आपल्या एका सहकाऱ्यासह ती  मस्करी करत असताना अचानक तोल जाऊन तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला आहे.  नगीनादेवी राम दुपारच्या सुमारास तिच्या सहकाऱ्यांसोबत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जिन्याजवळ बसली होती. ती बसली असताना तिचा सहकारी तिच्यासोबत मस्करी करीत होता. याच दरम्यान तिच्या सहकाऱ्याचा हात तिला लागला आणि त्यांचा तोल गेला.दोघांचा तोल गेल्याने क्षणार्धात नगीनादेवी तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडून तिचा मृत्यू झाला.  तिची मस्करी करणारा बंटी टाक याचा देखील तोल गेला. मात्र,  त्याला आजूबाजूला उभे असलेल्या लोकांनी वाचविले. या प्रकरणी मानपाडा पोलीसांनी बंटीला सदोषमनुष्यवधा गुन्हा दाखल केला असून अटक केला आहे


खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून सहा वर्षीय चिमुकल्यांचा मृत्यू


भाईंदर पश्चिमेच्या उत्तन परिसरातील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून या सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झालं आहे. किरण कॉलर असं या मुलाचे नाव असून हा चिमुकला धावगी येथील आजीकडे आला होता. खेळताना तो खड्ड्यातील पाण्या त गेला असता त्याचा बुडून मृत्यू झाला. अग्निशमन पथकाच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी या बालकाचे मृतदेह भाईंदर पाच्छिमेच्या पंडीत भीमसेन जोशी रुग्णालयात तपासणी साठी पाठवण्यात आला आहे. या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी यावर बोलण्यास नकार दिला आहे.