नागपूर : फुगे फेकून मारणाऱ्यांना थेट पोलिस कोठडीत डांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  होळी आणि रंगपंचमी शांततेत पार पडावी, यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताची आखणी केली आहे. 


'कोंबिग ऑपरेशन' 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहरातील विविध भागांमध्ये 'कोंबिग ऑपरेशन' सुरू करण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळपासूनच सीपी टू पीसी सर्वच रस्त्यांवर असतील.  होळीला कोणतेही गालबोट लागू नये, यासाठी पोलिसांनी आठवड्यापासूनच गुन्हेगारांची धरपकड सुरू केली आहे. 


सतर्कतेचे आदेश


होळी मागील वर्षी देखील शांततेत पार पडली. यावर्षीची होळीही शांततेत पार पडावी, याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. शहरातील सर्वच पोलिस ठाण्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. 


विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश


रंगपंचमीचा रक्तरंजित इतिहास बघता सर्वच वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मद्यपी वाहनाचालकांना थेट कोठडीत डांबण्याची तयारीही पोलिसांनी चालविली आहे. गोंधळ घालणाऱ्या युवकांना तत्काळ ताब्यात घेण्यात येईल.