मुंबई : २५ टक्के काम झालंय अजून ७५ टक्के करायचे आहे. जर कंपनीने मनापासून ठरवलं आणि कोणत्या परवानग्या शिल्लक राहील्या नाहीत तर २ वर्षात काम पूर्ण होईल. इंदू मिल येथील जागेची पाहणी शरद पवार यांनी केली.. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रस्तावित स्मारकासाठी जागेची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शापूजी पालनजी कंपनीने हे आव्हान म्हणून स्वीकारायला हवे. हे स्मारक मुंबई महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षण असेल. भारत आणि भारताबाहेर जिथे बौद्ध समाज आहे. त्या सर्वांमध्ये या स्मारकाबद्दल आकर्षण राहील. या देशातील प्रत्येक नागरिक महामानवाच्या दर्शनासाठी इथे आल्याशिवाय राहणार नाही. 



काही लोक स्मारकाला विरोध करत आहेत. यावरही पवारांनी उत्तर दिले. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपले मत व्यक्त करु शकतो असे पवार यांनी स्पष्ट केले.