Rajratna Ambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू राजरत्न आंबेडकर राजकारणात येणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाला पुनर्जीवित करून ते आंबेडकरी चळवळ पुढे नेणार आहेत. राजरत्न आंबेडकर लवकरच आपल्या राजकीय रणनितीची घोषणा करणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या 30 सप्टेंबरला मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात बैठक घेऊन राजरत्न आंबेडकर याबाबत घोषणा करणार आहेत.  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून महाराष्ट्रातील आगामी विधानसभा लढवणार असून, 5 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.  या व्यतिरिक्त अनुसूचित जातीच्या सर्व जागांवर रिपब्लिक पार्टीकडून उमेदवार उभे करण्यात येणार असल्याची माहिती राजरत्न आंबेडकरांनी झी 24 तासला बोलताना दिली0.


कोण आहेत राजरत्न आंबेडकर?


राजरत्न आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू आहेत. उच्चशिक्षित व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख आहे. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेचे ते चौथे अध्यक्ष आहेत. राजरत्न आंबेडकर संविधान जनजागृती मोहीम सक्रियपणे राबवली. राईट टू एज्युकेशनसाठी 10 वर्षांपासून ते सातत्याने काम करत आहेत.  


प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर आणि सुजात आंबेडकर हे तीन आंबेडकर सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय आहेत. आता राजरत्न आंबेडकर यांच्या रुपाने आणखी एक आंबेडकर राज्याच्या राजकारणात एन्ट्री करत आहेत.