औरंगाबाद : ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक डॉ गंगाधर पानतावणे यांचं निधन झालं. औरंगाबादमध्ये पानतावणेंनी अखेरचा श्वास घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मृत्यूसमयी ते ८१ वर्षाचे होते. आज संध्याकाळी पानतावणेंवर अंत्यसंस्कार करण्यात येतील. सकाळी साडे दहा वाजता औरंगाबादमधील राहत्या घरी त्याचं पार्थिव अत्यं दर्शनसाठी ठेवलं जाणार आहे.


डॉ. पानतावणेंना यंदाच त्यांच्या साहित्यातील योगदानासाठी मानाचा 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाला होता. परंतु, पुरस्कार स्विकारण्याअगोदरच पानतावणे कालवश झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे.


दलित साहित्याला डॉ. पानावणेंनी नवा आयाम दिला. तरुण वयात तत्कालीन दलित साहित्याचा सखोल अभ्यास करून त्याची परखड समीक्षा करून पानातवणेंनी नवा विचार लोकांसमोर आला. 


'अस्मितादर्श' या त्रैमासिकातून पानातवणेंनी सातत्यानं नवा विचार मांडला. धम्मचर्चा, मूल्यवेध, मूकनायक, विद्रोहाचे पाणी पेटले अशा दलित चळवळीशी निगडीत साहित्यानं पानतावणेंनी उभ्या महाराष्ट्राच्या मनात स्थान मिळावलं. 


दलित आत्मकथा, दलित साहित्य, चर्चा आणि चिंतन लोकरंग, स्तीर आत्मकथन अशा काही ग्रंथांचं संपादनही पानतावणेंनी केलं. अमेरिकेत सॅन होजेमध्ये झालेल्या पहिल्या विश्वसाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद पानतावणेंनी भूषवलं. 


पानतावणेंच्या निधनानं महाराष्ट्राच्या विचारवंत साहित्यिकांच्या परंपरेतला आणखी एक तारा निखळल्याची भावना सर्वत्र व्यक्त आहे.