मुलांवर कोणत्याही गोष्टी लादू नका- डॉ. सुभाष चंद्रा
नवीन पीढीला त्यांच्या मनाप्रमाणे करियर निवडण्याची संधी देणं गरजेचं आहे.
पुणे : नवीन पीढीला त्यांच्या मनाप्रमाणे करियर निवडण्याची संधी देणं गरजेचं आहे. त्यांच्यावर विशिष्ट गोष्टी लादण्याचा प्रयत्न केल्यास त्यात त्यांना अपयश येण्याची शक्यता असते. असं मत झी समुहाचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष चंद्रा यांनी व्यक्त केलं आहे.
पुण्यात अग्रवाल समाजतर्फे आयोजित अग्रसेन जयंती समारंभात ते बोलत होते. विविध क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या अग्रवाल समाजातील मान्यवरांचा यावेळी डॉक्टर सुभाष चंद्रा यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
आजच्या काळात माणसाच्या मनावरील दडपण कमी झाल्यास बहुतेक समस्या आपोआप सुटतील. कौटु्बिक संस्कार तसंच शिक्षणही त्यात महत्त्वपुर्ण ठरतं, असंही त्यांनी सांगितलं.