नागपूर : पेंच -2 जलशुद्धीकरण केंद्र 18 तास बंद राहणार आहे. 31 मे सकाळी 10 ते 1 जून सकाळी 6 पर्यंत या कालावधीत शहरातील चार झोनमध्ये पाणीपुरवठा असेल बाधित असेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर शहरातील धरमपेठ, लक्ष्मीनगर, हनुमान नगर आणि मंगळवारी झोन्समध्ये 22 जलकुंभाचा पाणीपुरवठा राहणार बाधित राहणार आहे.


अमृत' योजनेअंतर्गत ' गिट्टीखदान नवीन जलकुंभ' आंतरजोडणी करीता हे शटडाउन आहे.


पाणीपुरवठा जून 1 ला सकाळी 10 नंतर पूर्ववत होणार आहे.  नागपूर महानगरपालिकेने अमृत योजनेअंतर्गत 3.20. दशलक्ष लिटर (3.20 MLD) क्षमतेचे नवीन जलकुंभ गिट्टीखदान (रामदेवबाबा टेकडी) येथे बांधले आहे. या जलकुंभाची 1200मीमी च्या जलवाहिनीवर आंतरजोडणी करण्याकरिता जलकुंभाचे शटडाउन असणार आहे. या 18 तासांच्या शटडाऊन कालावधी दरम्यान बाधित भागांना टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.