Mumbai Crime News : मुंबई पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई केली आहे. मुंबई पोलीसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ड्रग्स प्रकरणात एकाचवेळी अकरा ठिकाणी छापेमारी करत मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील 11 ठिकाणी छापेमारी करत जवळपास दोन कोटी 22 लाखांचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत. या धडक कारवाईमुळे ड्रग्ज माफियांचे धाबे दणाणले आहेत.


मुंबई पोलिसांची धडक कारवाई


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कारवाईत एकूण एक किलो 110 ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत. मुंबईतील ग्रँड रोड, माजगाव, नागपाडा,  आगरी पाडा, सांताक्रुज पूर्व,  कॉटन ग्रीन या विभागात एकूण 11 ठिकाणी छापेमारी मध्ये करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण 11 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. एमडी ड्रग्स प्रकरणात मोठे रॅकेट असल्याच्या अनुषंगाने मुंबई पोलीस अधीक तपास करत आहेत.

अमली पदार्थ विरोधी पथकाच्या बांद्रा पथकाने हे धाडसत्र राहवले. अटक आरोपी हे मुंबई व मुंबई शहरातील उपनगरात अशा प्रकारचे ड्रग्स विक्री करत होते. भारताबाहेरून पाहिजे असलेला एका आरोपीच्या संपर्कात राहून ड्रग्स खरेदी विक्रीचा व्यवसाय चालवत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याच प्रकरणात पोलीस अधिकारी तपास करत आहेत.


नाशिकमध्ये एमडी ड्रग्ज विक्रेत्याला बेड्या


दोन दिवसांपूर्वीच नाशिक शहर पोलिसांच्या एमआयडीसी चुंचाळे पोलीस पथकाने एमडी ड्रग्ज विक्रेत्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून 27.5 ग्रॅम एमडीसह एकूण 3 लाख 34 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच यात आणखी चार व्यक्तींना देखील अटक करण्यात आलीय. एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकीच्या हद्दीत एक्सलो पॉईंटजवळ मुंब्रा ठाणे येथुन एक व्यक्त मॅफेड्रॉन (एमडी) या अंमली पदार्थाची स्थानिक व्यक्तीला विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा लावला. संशयित व्यक्ती  मुस्ताक शेख उर्फ भुऱ्या हा काही संशयीत व्यक्तींसोबत बोलताना आणि एक पाकीट घेउन पैसे देताना निदर्शनास आले. पोलीस पथकाने त्यांच्यावर छापा मारून कारवाई केली. या पाच संशयितांकडून 27.5 ग्रॅम एमडी आणि रोख रक्कम असा एकूण 3 लाख 24 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.