निफाडमध्ये दारूच्या नशेत मुलानंच केला वडिलांचा खून
![निफाडमध्ये दारूच्या नशेत मुलानंच केला वडिलांचा खून निफाडमध्ये दारूच्या नशेत मुलानंच केला वडिलांचा खून](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2020/02/18/370745-295627-muder1.jpg?itok=bCUTWSMZ)
निफाडमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
नाशिक : दारूच्या नशेत मुलानेच आपल्या वडिलांचा खून केल्याची घटना उघड झाली आहे. निफाडमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. दारूच्या नशेत मुलाने डोक्यात कुऱ्हाड मारल्याने वडिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. नवरा बायकोच्या भांडणात वडील पडल्याने रागाच्या भरात मुलाने वडिलांच्या डोक्यात कुऱ्हाड मारली.
निफाड तालुक्यातल्या सोनेवाडी बुद्रुकमध्ये हा प्रकार घडला. बबन निवृत्ती निरभवणे असं या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी आरोपीला सापळा रचून अटक केली आहे. पण या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.