अटक टाळण्यासाठी डी एस कुलकर्णींची सर्वोच्च न्यायालयात धाव
पुण्यातले बाधंकाम व्यवसायिक डी एस कुलकर्णी यांनी सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. ऑनलाईनद्वारे त्यांनी हा अर्ज केला आहे. त्यांच्या अर्जावर पाच जानेवारीला सुनावणी होणार आहे.
मुंबई : पुण्यातले बाधंकाम व्यवसायिक डी एस कुलकर्णी यांनी सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. ऑनलाईनद्वारे त्यांनी हा अर्ज केला आहे. त्यांच्या अर्जावर पाच जानेवारीला सुनावणी होणार आहे.
अटकपूर्व जामीन अर्जावर जानेवारीत सुनावणी
नाताळ आणि नववर्ष निमित्तानं तीन जानेवारीपर्यंत सुप्रीम कोर्टाला सट्टी असल्यानं, डीएसकेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आता पाच जानेवारीला सुनावणी होईल.
दरम्यान डीएसकेंचा जामीन अर्ज हायकोर्टानं फेटाळून दोन दिवस झालेत. या काळात पोलिसांना अजूनही डीएसकेंचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे पुणे पोलीस डीएसकेंना अटक करण्याचं टाळत आहेत का अशी शंका, ठेवीदारांकडून व्यक्त केली जात आहे.
डीएसके पत्नीसह पोलिसांच्या लेखी गायब
हायकोर्टात पंधरा दिवसांत पन्नास कोटी रुपये जमा करण्यात अपयशी ठरलेले डीएसके पत्नीसह पोलिसांच्या लेखी गायब आहेत. पन्नास कोटी भरु शकलो नाही, तर स्वतः पोलिसांसमोर हजर होऊ असं डीएसकेंनी हायकोर्टात सांगितलं होतं.
हायकोर्टाने जामीन फेटाळल्यानंतर डीएसके अटकपूर्व जामिनासाठी स्वाभाविकपणे सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डीएसके सपत्नीक दिल्लीत असल्याचं सांगितलं जातं आहे.