मुंबई : कोरोनाच्या पार्शवभूमीवर मजूर कामगारांसाठी शिवभोजन थाळीचा विस्तार करण्यात आला आहे. आजपासून याची त्वरित अंमलबाजवणी करण्यात आली आहे. यानुसार शिवभोजन थाळी मिळण्याची वेळ वाढवण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहा रुपयांमध्ये मिळणाऱ्या शिवभोजन थाळीची किंमत ५ रुपये करण्यात आली आहे. तसेच सुविधा केंद्रांची वेळ ११ ते ३ पर्यंत वाढवण्यात आली आहे. दररोज एक लाख लोकांपर्यंत शिवभोजन थाळी पोहोचवण्यात येणार आहे. कोरोनच्या पर्शवभूमीवर कामागर, मजूर यांची उपासमार होऊ नये यांसाठी ही सोय करण्यात आली आहे. 


शिवभोजन थाळी फूड पॅकेट्स स्वरूपात पोहोचविण्यात येणार आहे. जेणेकरून गर्दी होणार नाही. कोरोनाच्या पर्शवभूमीवर सर्व केंद्रात सॅनिटायझर्सची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.



कठोर निर्णय हाच उपाय- पंतप्रधान


'जगभरातील परिस्थिती पाहता हाच एक पर्याय आहे. या निर्णयामुळे सामोरं जावं लागत असलेल्या कठीण परिस्थितीसाठी माफी मागतो. मात्र नंतर रोग असाध्य होतात. कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला घेरा घातला आहे. प्रत्येकाला हा व्हायरस आव्हान देत आहे. त्यामुळे सर्वांना एकत्र येत कोरोनाविरोधात लढा द्यायचा आहे.' असं मोदींनी सांगितलं. कोरोनाविरोधात सुरु असलेल्या लढ्यात अहोरात्र काम करणाऱ्या, पोलीस, नर्स, डॉक्टरांचेही मोदींनी आभार मानले आहेत.


मोदींनी 'हा लॉकडाऊन सर्वांना वाचवण्यासाठी केला आहे. तुम्हाला स्वत:ला वाचवायचं आहे. तुमच्या कुटुंबाला वाचवायचं आहे. कोणालाही कायदे,नियम मोडण्याची ईच्छा नाही, परंतु काही लोक या नियमांचं पालन करत नाही. जगभरातील अशाप्रकारे नियमांचं पालन न करणारे लोक आज पश्चाताप करत आहेत. जगात सर्व सुखांचं साधन आपलं आरोग्य आहे. मात्र काही लोक नियम मोडून आपल्या आरोग्याशी, जीवाशी खेळ करत आहेत' असं ते म्हणाले.