Sunday Mega Block Mumbai : मध्य रेल्वेतर्फे रविवारी 12 नोव्हेंबर रोजी मेगा ब्लॉक जाहीर करण्याता आला होता तसेच परिपत्रक देखील जारी करण्यात आले होते. मात्र, दिवाळीचा सण असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होवू नये सासाठी मध्य रेल्वेने हा मेगा ब्लॉक रद्द करण्याच्या निर्णय घेतला आहे. मेगा ब्लॉक रद्द करण्यात आल्याचे नोटीफीकेशन मध्य रेल्वेतर्फे जारी करण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रवाशांना दिवाळीचे गिफ्ट


ऐन दिवाळीत मेगा ब्लॉक घेण्यात येत असल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी पसरली होती. दिवाळीचा पहिलाच दिवस दिवाली निमित्ताने लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडतात. यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने मेगा ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या कोणत्याही रेल्वेच्या कोणत्याही मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार नाही. रेल्वेच्या तिन्ही मार्गावर सर्व लोकल ट्रेन या नियोजीत वेळेनुसार धावणार आहेत. 


असा होता मेगा ब्लॉक


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४९ या वेळेत सुटणाऱ्या धीम्या लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जाणार होत्या. भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकांवर थांबून  पुढे डाऊन वर वळवल्या जाणार होत्या. सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ पर्यंत घाटकोपरहून सुटणाऱ्या अप स्लो सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी/वांद्रे हार्बर लाईन सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत. 
सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोडवरून सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे/गोरेगाव येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत पनवेल/बेलापूर/वाशीहून सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रेहून सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
 
तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे. हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत.