घाटात दरड कोसळल्याने सिंहगडावर जाण्याचा मार्ग बंद
सिंहगड घाटात पहाटे दरड कोसळल्यानं सिंहगडावर जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.
पुणे : सिंहगड घाटात पहाटे दरड कोसळल्यानं सिंहगडावर जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. ही दरड हटवण्याचे काम सुरू करण्यात आलं असून, त्यासाठी किती वेळ लागेल, हे निश्चित सांगता येत नाहीय. हवेली पोलीस आणि वन विभागानं गडावर जाण्याचा रस्ता बंद केलाय. त्यामुळं वर्षा सहलीसाठी आलेल्या हजारो पर्यटकांची घोर निराशा झालीय. त्यांना अर्ध्या वाटेतून माघारी परतावं लागतंय.
गेल्यावर्षी ३० जुलै रोजी ज्याठिकाणी दरड कोसळली होती, त्याच्या जवळच रविवारी पहाटे दरड कोसळलीय. त्यावेळी संध्याकाळी ही दुर्घटना घडल्यानं असंख्य पर्यटक गडावर अडकून पडले होते. मात्र आज पहाटे हा प्रकार घडल्यानं गडावर पर्यटक नव्हते.