Maharashtra Politics, नाशिक : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे गटात(Shinde Group) अंतर्गत धुसफूस सुरु असल्याची चर्चा होती. शिंदे गटातील दोन आमदारांमधील वाद आता चव्हाट्यावर आल्याने या चर्चेला पुष्टी मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांच्या नाशिक(Nashik) दौऱ्यात दोन आमदारांची नाराजी उघडपणे पहायला मिळाली आहे. यामुळे शिंदे गटात फुट पडल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाकरेंच्या नेतृत्वावर नाराज होऊन एकनाथ शिंदे तब्बल 40 आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार रातोरात कोसळले. यानंतर राज्यात नवे शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले.


पक्ष नेतृत्वावरील नाराजीचे कारण पुढे करत ठाकरे गटातून  बाहेर पडलेल्या शिंदे गटालाही आता नाराजीचा सामना करावा लागतोय


पक्ष नेतृत्वावरील नाराजीचे कारण पुढे करत ठाकरे गटातून  बाहेर पडलेल्या शिंदे गटालाही आता नाराजीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिक दौ-यात शिंदे गटातील आमदारांची नाराजी उघडपणे पहायला मिळली. शिंदे समर्थक या दोन आमदारांच्या नाराजी नाट्याची जोरदार चर्चा होत आहे. 


का आहेत आमदार नाराज?


पालकमंत्री दादा भुसे आणि नांदगावचे आमदार सुहास कांदे यांचे दोन्ही गट वेगवेगळ्या ठिकाणी शिंदेच्या स्वागताला उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी आमदार सुहास कांदे यांनी जिल्ह्यातील पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली होती. पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरुन सुहास कांदे नाराज आहेत. पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करताना विश्वासात घेतले जात नसल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यानंतर मुख्यंमत्र्यांच्या दौ-यात ही नाराजी स्पष्टपणे दिसून आली.