मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये नागरिक खूप जास्त प्रमाणात घरात राहिले. एवढ्या मोठ्या कालावधीसाठी घरी राहण्याचा बहुतेक हा प्रत्येकाची पहिलीच वेळ. लॉकडाऊनच्या या काळात हॉटेल, खानावळी आणि फूड होम डिलिव्हरीला पूर्ण बंदी होती. अशातच नागरिकांची बऱ्याच प्रमाणात गैरसोय झाली. मात्र या काळात सर्वाधिक प्रमाणात विक्री झाली ती २ मिनिटांत तयार होणाऱ्या 'मॅगी'ची. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाऊनमध्ये घरपोच जेवण मिळत नसल्यामुळे फास्ट फूडला पसंती मिळाली. DUNZO या शॉपिंग ऍपच्या रिपोर्टनुसार, हे ऍप वापरणाऱ्यांनी आपली भूक शांत करण्यासाठी DUNZO चा सर्वाधिक वापर केला. 'मॅगी' सर्वाधिक प्रमाणात ऑर्डर करण्यात पुणेकर सर्वात पुढे आहेत. तसेच दिल्ली, चेन्नई आणि मुंबईच्या नागरिकांनी मात्र या लॉकडाऊनमध्ये 'चहा'पेक्षा 'कॉफी' सर्वाधिक वेळा ऑर्डर करून आपली पसंती दर्शवली. 


DUNZO नुसार, बंगळुरुच्या नागरिकांनी सर्वात जास्त प्रमाणात 'बिर्याणी' ऑर्डर केली आहे. तर मुंबईकरांनी 'डाल खिचडी;ला सर्वाधिक पसंती दिली आहे. तसेच चेन्नईने सर्वात जास्त प्रमाणात ऑनलाईन 'इडली' ऑर्डर केली आहे. गुरूग्रामच्या नागरिकांनी जास्त प्रमाणात 'पोटॅटो टिक्की बर्गर'ला पसंती दिली आहे. 



कोरोनाच्या काळात देशभरात नागरिकांनी सात्विक आहार स्वीकारला. लॉकडाऊनमध्ये काळात कामानिमित्त घराबाहेर राहणारी व्यक्ती आहे त्या ठिकाणी अडकली. अशावेळी जेवण बनवता येत नसल्यामुळे फास्ट फूड अथवा लवकर तयार होणाऱ्या पदार्थावर अवलंबून राहावं लागलं. पुण्यात आयटी हब असल्यामुळे कामानिमित्त घरापासून लांब राहणाऱ्या युवकांची संख्या जास्त आहे. अशावेळी या तरूणांनी मॅगीला सर्वाधिक पसंती दिली आहे.