ठाणे : ठाणे आणि आसपासच्या भागात मंगळवारी मध्यरात्री भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान विज्ञान विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार, रात्री उशीरा २.२१ मिनिटांनी जाणवलेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून खाली १० किलोमीटरवर होता. 
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणत्याही संपत्तीचं नुकसान किंवा कोणत्याही प्रकारची हानी झाल्याचं आढळलेलं नाही. 


यापूर्वी जुलै महिन्यात हिमाचल प्रदेशच्या चंबा भागात भूकंपाचे हलके धक्के जाणवले होते. या भागात मे महिन्यातही सलग तीन दिवस भूकंपाचे धक्के जाणवले होते. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सायंकाळी ७.१८ मिनिटांनी ३.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का चंबा भागत बसला होता. भूकंपाचा केंद्रबिंदू जम्मू आणि काश्मीर सीमावर स्थित चंबा भागात होता.