ठाणे : विविध सण आता इको फ्रेंडली पद्धतीने साजरा करण्याकडे सा-यांचा कल दिसतो. मग याला दिवाळी सणसुद्धा अपवाद कसा ठरेल. दिवाळीसाठी इकोफ्रेंडली आकाशकंदील खरेदी करण्याला नागरिकांची पसंती मिळतेय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकांची आवड आणि गरज लक्षात घेता ठाण्यातील राममारुती रोडवरील हेरंब आर्ट्सनं इथं गेल्या 15 दिवसांपासून इकोफ्रेंडली आकाशकंदील विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व आकाशकंदील मूकबधीर मुलांनी साकारलेत. त्यासाठी हेरबं आर्ट्सच्या कैलास देसले यांनी या मुलांना प्रशिक्षण दिलंय. आणखी एक खास बात म्हणजे बिग बींच्या घरीही हेच कंदील उजळण्याची शक्यता आहे. 


इथले आकाशकंदिल बिग बींच्या घरी पाठवण्यात आलेत. दरवर्षी बिग बी, हृतिक रोशन आणि काही मराठी कलाकारांच्या घरी इथलेच आकाशकंदील जातात. याशिवाय ठाण्यातील हे आकाशकंदील दरवर्षी परदेशात पाठवण्यात येतात.  तसेच यंदा देखील दुबई, यु.एस.ए, युके आणि नायझेरिया या देशांमध्ये हे कंदील जाऊन पोहचले आहेत.