रायगड : कर्नाळा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी  शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीने ताब्यात घेतले आहे.  कर्नाळा सहकारी बँकेत 600 कोटीचा घोटाळा झाल्याचं समोर आले आहे. ठेवीदारांच्या नावे बोगस कर्ज घेतल्याचे उघड झाले आहे. (ED arrest former MLA Vivek Patil on Karnala bank scam)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज ईडीने या प्रकरणात विवेक पाटील यांना ताब्यात घेतले आहे. विवेक पटेल यांनी पनवेलमधून ताब्यात घेण्यात आले आहे.  बँकेत घोटाळा झाल्याचं पुढे आल्यानंतर बँकेच्या व्यवहारांवर मर्यादा घालण्यात आल्या होता. पण आज या प्रकरणात ईडीने कारवाई केली आहे.


कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणात संचालकांसह 76 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  कोट्यवधींचा अपहार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.