कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : भाजपशी (BJP) जुळवून घ्या असा सल्ला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिला. मग ठाकरेंविरोधात बंडही केलं आणि एकनाथ शिंदेंची (CM Eknath Shinde) साथ दिली. त्यामुळे ईडीचा (Enforcement Directorate) फेरा टळेल आणि अडचणी संपतील अशी आशा आमदार प्रताप सरनाईकांना (Pratap Sarnaik) होती. पण घडतंय भलतंच. प्रताप सरनाईकांच्या प्रॉपर्टीवर पुन्हा एकदा ईडीची वक्रदृष्टी पडलीय. सरनाईकांची 11 कोटींची मालमत्ता ईडी जप्त करणार आहे. NSEL घोटाळ्याप्रकरणी सरनाईकांचे ठाण्यातील दोन फ्लॅटस आणि मीरा रोडवरील एक फ्लॅट लवकरच जप्त करण्यात येणार आहे. यापूर्वी या प्रॉपर्टीवर तात्पुरती कारवाई झाली होती. आता या प्रकरणाचा तपास पूर्ण झालाय आणि त्यामुळेच ईडी संपत्ती जप्त करण्याच्या निर्णयापर्यंत पोहचलीय. ॉ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे ही वाचा : पंकजा मुंडेंचा आणखी एक पराभव; 30 वर्षांचा गड कोसळला..


काय आहे NSEL घोटाळा? 
2013 मध्ये NSEL घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (crime branch mumbai) FIR दाखल केला होता. NSEL घोटाळ्याची चौकशी ईडीनं सुरू केली. संचालकांसह 25 जणांविरोधात मनी लाँड्रिंग (Money Laundering) प्रतिबंधक कायद्यानुसार चौकशी सुरू झाली होती. या घोटाळ्यातील आरोपींनी गुंतवणुकीची रक्कम रिअल इस्टेट, थकीत कर्जाची परतफेड आणि इतर कामांसाठी बेकायदेशीरपणे वापरली असल्याचं निष्पन्न झालं. जवळपास 13 हजार गुंतवणुकदारांच्या 5600 कोटींच्या रक्कमेचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. आता याप्रकरणी प्रताप सरनाईकांच्या 11 कोटींच्या प्रॉपर्टीवर टाच येतेय


हे ही वाचा- Maharashtra Police Recruitment : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोलीस भरतीबाबत मोठी अपडेट


केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा टाळण्यासाठी भाजपसोबत जुळवून घेण्याचा सल्ला सरनाईकांनी तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दिल्याची चर्चा होती. त्यानंतर झालेल्या शिंदे गटाच्या बंडात सरनाईकही सामील झाले. तरीही सरनाईकांना ईडीनं दणका दिलाय. त्यामुळे तत्कालीन ठाकरे सरकारच्या काळात ईडीनं कारवाई केलेल्या आणि आता शिंदे सरकारमध्ये असलेल्या इतर नेत्यांमागेही पुन्हा ईडीचा ससेमीरा लागणार का याची उत्सुकता आहे.