मुंबई: अनिल देशमुखांच्या अडणीत मोठी वाढ झाली आहे. शुक्रवारी देखमुखांच्या मुंबई आणि नागपुरातील घरावर ईडीनं छापेमारी केली होती. ईडीच्या धाडसत्रानंतर आता आनिल देशमुख यांना आज सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनिल देशमुख यांचे स्वीय सचिव संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना ईडी ने अटक केली. दोघांनाही आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. शुक्रवारी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली होती. अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूरच्या घरांवरही ईडीनं धाड टाकली होती. 


ईडीने  सचिन वाझे यांचा जबाब नोंदवला आहे. तळोजा जेलमध्ये जाऊन ईडीने हा जबाब घेतला. अनिल देशमुखांच्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी प्रकरणी हा जबाब नोंदवण्यात आला आहे. तर दुसरीकडे अनिल देशमुखांनी परमबिर सिंह यांनी केलेल्या आरोपावर आपलं मत मांडलं आहे. 


परमविर सिंह यांचं वागणं संशयास्पद असून चौकशीनंतर अखेर सत्य बाहेर येईलच असा विश्वास अनिल देशमुख यांनी व्यक्त केला आहे. आयुक्तपदावरून हटवल्यामुळे त्यांनी हे आरोप केल्याचं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. आजच्या ईडीच्या चौकशीनंतर अनिल देशमुखांनाही अटक करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.