औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील उद्योजक, व्यावसायिक  देखील ईडीच्या निशाण्यावर आहेत. आज दुपारी बारा वाजल्यापासून दोन मोठ्या व्यावसायिकांच्या सात वेगवेगळ्या ठिकाणांवर ईडीने धाडी टाकल्या आहेत. बिल्डर आणि बियाणे कंपनीशी संबंधित या मोठे व्यक्ती आहेत. अजुनही ईडीचे धाडसत्र सुरूच आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबाद शहरातील अदालत रोड वरील कार्यालयात आणि नक्षत्रवाडी परिसरातील कार्यालयात आणि घरी हे छापे टाकण्यात आले आहेत. या दोन बड्या उद्योजकांच्या सात वेगवगळ्या ठिकाणांवर छापासत्र सुरू आहे. यामध्ये हिशेब नसलेली संपत्ती आणि मनी लाँड्रींगच्या आधारे हे छापासत्र सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे.


राज्यात गेल्या काही दिवसांत अनेक बडे नेते आणि उद्योजकांविरोधात ईडीचं धाडसत्र सुरु आहे. ईडीच्या रडावर आता औरंगाबादमधील उद्योजक आणि व्यावसायिक आहेत.