मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देखमुख यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीने छापेमारी केली आहे. शुक्रवारी सकाळी ईडीने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थानी छापे टाकले. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनिल देशमुख यांच्या घरी ईडीकडून झडाझडती सुरू आहे. या तपासासाठी 6 ते 7 अधिकारी नागपुरातील देशमुखांच्या घरी पोहोचले आहेत. अनिल देशमुख यांच्या घराबाहेर बंदोबस्तासाठी सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत.


100 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांच्या आरोपावरून अनिल देशमुख यांच्यावर ईडीनं गुन्हा दाखल केला होता. 25 मे रोजी अनिल देशमुखांशी संबंधित नागपुरातील तिघांकडे ईडीने चौकशी केली होती.



100 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी आता अनिल देशमुखांवर झालेल्या आरोपानंतर ईडीच्या या छापेमारीमुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.