झी 24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट! बोगस शिक्षक भरती प्रकरणात शिक्षणमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
Education Minister orders inquiry : झी २४ तासनं दाखवलेल्या शिक्षण क्षेत्रातील बोगस शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिले. या घोटाळ्यात सामील असलेल्या कुणालाही पाठीशी घालणार नाही, अशी ग्वाही त्यांनी झी २४ तासशी बोलताना दिली.
Bogus teacher recruitment scam in Maharastra : अमळनेर शहर हे या शिक्षण घोटाळ्याची कर्मभूमी... दर महिन्याला घोटाळेबाज या शिक्षण घोटाळ्यातून सरकारी तिजोरीवर लाखोंचा दरोडा टाकतायत. शिक्षकी पेशाला काळीमा फासणारे हे घोटाळे समोर येतातसुद्धा मात्र शिक्षण विभागातील अधिका-यांच्या भ्रष्ट कारभारामुळे घोटाळे समोर येत असूनही कारवाई होत नसल्याचा आरोप आहे. तर दुस-या बाजूला पगाराचा बोजा वाढतो म्हणून गेल्या तीन दशकांपासून शिक्षकांना शिक्षण सेवक म्हणून काम करावं लागतंय. या मुद्द्यावर झी 24 तासने महाराष्ट्रासमोर मांडल्यानंतर शिक्षणमंत्र्यांकडून बोगस शिक्षक भरती घोट्ळ्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
शिक्षणमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
अमळनेरमधील बोगस शिक्षक घोळ्याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. एका आठवड्याच्या आत कारवाई केली जाईल, असं आश्वासन दीपक केसरकर यांनी झी 24 तासशी बोलताना दिली आहे. घोटाळ्यात सामील कुणालाही पाठिशी घालणार नाही, असंही केसरकर यांनी म्हटलंय. या प्रकरणात पिडित शिक्षकांनी तक्रारी करा.. तुमचं नाव गोपनिय ठेवलं जाईल, असं आश्वासन देखील दीपक केसरकर यांनी दिलं आहे. तर शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी देखील या प्रकरणाची दखल घेतली आहे. बोगस शिक्षक घोळ्याचा मुद्दा अधिवेशनात मांडणार असल्याचं किशोर दराडे यांनी झी 24 तासला आश्वासन दिलंय.
जळगावच्या अमळनेरमधली प्रताप हायस्कूलमध्ये साने गुरुजींनी 1924 ते 1930 ते अशी सहा वर्ष विद्यार्थ्यांना घडवलं. मात्र याच शाळेत घोटाळ्याचा धडा गिरवण्यात आल्याचा आरोप आहे. बोगस शिक्षक भरतीच्या तक्रारीनंतर ती रद्द करण्यात आली खरी, मात्र कोरोनाच्या काळात मौका साधत पुन्हा बोगस भरती करण्यात आल्याचा आरोप माजी संचालकांनी केलाय. फक्त साने गुरुजींच्या प्रताप हायस्कूलमध्येच नाही तर अमळनेर तालुक्यात आणि जळगावमध्ये शेकडो शाळांमध्ये अशाच पद्धतीने घोटाळे करुन सरकारी तिजोरीवर दरोडा घातला जात असल्याचा आरोप आहे.