नागपूर : SSC, HSC Exam : दहावी आणि बारावी परीक्षेबाबत महत्वाची बातमी. 10वी, 12वी परीक्षेत मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या परीक्षेसाठी इमारती न देण्यावर शिक्षणसंस्था महामंडळ ठाम आहे. दरम्यान, याबाबत सरकारकडून अद्याप कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही. त्यामुळे पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. ( Educational Institutions in Nagpur and Amravati  is adamant on not providing buildings for 10th and 12th examinations.)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर आणि अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांच्या शिक्षणसंस्था संचालक मंडळातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत परीक्षेसाठी इमारती न देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. 


वेतनाव्यतिरिक्तचे अनुदान तातडीने द्यावे, अशी शिक्षणसंस्था चालकांची मागणी आहे. त्यात अपुरे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या पाहता परीक्षा घेण्यास विरोध होत आहे. त्यामुळे 10वी, 12वीच्या परीक्षांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. यावर ताबडतोब तोडगा काढण्याची मागणी होत आहे.