विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव: राज्यातील आठ तालुके शासनानं दुष्काळी घोषीत केलेत. यात जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, मुक्ताईनगर तसंच बोदवड तालुक्यांचा समावेश आहे. या तिनही तालुक्यांत दुष्काळाची झळ तीव्र आहे. मात्र, राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील तालुक्यातही पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या झळा तीव्र आहे. असे असतानाही राज्य सरकारने केवळ आठच तालुके दुष्काळी म्हणून जाहीर केले आहेत.


तालुक्यात भीषण पाणीटंचाई 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, शेलवड गाव... जळगाव जिल्ह्यातल्या बोदवड या दुष्काळी तालुक्यातील गाव... इथल्या नद्या, नाल्यांमध्ये पाण्याचा टिपूसही नाही.. विहिरींनी तळ गाठलाय.. जिथं कुठं पाणी आहे तिथं माणसं आणि जनावरांची अशी गर्दी.. या गावाची लोकसंख्या सात हजाराहून अधिक आहे.. मात्र गावात कुठलीही पाणी पुरवठा योजना नाही.. त्यामुळे पाण्यासाठी इथल्या गावक-यांची बारमाही भटकंती सुरु असते.. प्रसंगी पाणी विकत घ्यवं लागतं.. किंवा  गढूळ पाण्यावर आपली तहान भागवावी लागते..  पाण्याअभावी आनेक गावकरी गाव सोडून गेलेत.. अनेकांनी आपली जनावरं विकली... तालुक्यात भीषण पाणीटंचाई असताना प्रशासनाला त्याचं काही सोयरंसुतक नाही..


तालुक्यातील अनेक गावांची अशीच अवस्था


ही व्यथा एकट्या शेलवड गावाचीच नाही.. तर तालुक्यातील अनेक गावांची अशीच अवस्था आहे..  जिथं प्यायला पाणी नाही तिथं शेतीचा  विचारच कसा करायचा.. त्यामुळे गावकरी मिळेल ते काम करतात..  माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या मतदारसंघातलं हे गाव.. याच गावात अशी अवस्था असेल तर इतर गावांची कल्पनाच केलेली बरी.. गावात लोकं पाण्यासाठी तडफडत असताना अद्याप तहसीलदार किंवा इतर कोणताही प्रशासकीय अधिकारी या गावांकडे फिरकलेला नाही..  त्यामुळे तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषीत करुन काय फायदा असा सवाल इथले ग्रामस्थ विचारत आहेत..