जळगाव : भाजप सरकावर ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा जोरदार टीका केली. खडसेंनी सरकारवर टीकेची झोड उठवली. मी गैरव्यवहार केला असेल तर सरकारने जनतेला दाखवावा, असंही खडसे यावेळी म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत आज जळगाव जिल्ह्यातील बोदवड आणि मुक्ताईनगरसाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचं भूमिपूजन पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर तसंच माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडला. यावेळी त्यांनी टीका केली.


पाण्याचा भीषण प्रश्न सुटणार


बोदवड तसंच मुक्ताईनगर हे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या मतदारसंघात असून ही योजना पूर्णत्वास आल्यांनातर दोन्ही तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा भीषण प्रश्न मिटणार आहे.
माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा स्वकीयांवर प्रहार केला. ज्यांन रोपटं लावलं तोच उन्हात जाऊन बसलाय त्यामुळं अपेक्षा कोणाकडून करावी, असा प्रश्न पडला असल्याची खंत खडसेंनी व्यक्त केली.



सरकारवर टीकेची झोड 


जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे ४५ कोटी रुपये खर्च प्रस्तवित असलेल्या मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेचा शुभारंभ पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर तसच खडसेंच्या उपस्थितीत झाला. यावेळी खडसेंनी पुन्हा सरकारवर टीकेची झोड उठवली. मी गैरव्यवहार केला असेल तर सरकारने जनतेला दाखवावा असंही खडसे यावेळी म्हणाले.