वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : राष्ट्रवादीचे (NCP) जेष्ठ नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसला आहे. एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला असलेला मुक्ताईनगर (muktainagar) तसेच रावेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेत (balasahebanchi shivsena) प्रवेश केला आहे. मंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांच्या उपस्थितीत गावातील अजिंठा शासकीय विश्राम गृह येथे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला असून हा एकनाथ खडसे (eknath khadse) आणि राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. (Eknath Khadse Muktainagar Raver taluka NCP party worker join balasahebanchi shivsena)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुक्ताईनगर येथील राष्ट्रवादीचे सोशल मीडिया माजी जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील, तालुका राष्ट्रवादी सरचिटणीस वाय डी पाटील , निंभोरा उपसरपंच प्रशांत पाटील, राष्ट्रवादी सोशल मीडिया ब्लॉगर शुभम मुर्हेकर धामोडी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. 


"त्यांना धक्के तर कायमच चालले आहेत, त्यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. लोण्याचे धक्के, दुधाचे धक्के, तुपाचे धक्के आणि आता हे माणसांचे धक्के," अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंना जोरदार टोला लगावला आहे. 


दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यातही अनेक दिवसांपासून वाद रंगत असून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. दोन्ही नेत्यांनी अनेकदा एकमेकांना जाहीर आव्हान देखील दिलं आहे.