`...त्यांना मुक्ताईच शिक्षा देईल`
निर्दोष सुटण्याचा खडसेंना विश्वास
जळगाव : संत मुक्ताईंच्या ३०९व्या व्या दिंडीचं आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान होतंय. यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सपत्निक मुक्ताईच्या पालखीची पूजा केली. कितीही त्रासलो तरी संत मुक्ताईच्या आशीर्वादानं आपण निर्दोष सुटणार असा विश्वास यावेळी खडसेंनी व्यक्त केला. चूक नसतानाही आपली बदनामी करण्यात आली. हे सारं आपण राजकीय जीवनातच अनुभवलं. ज्यांनी आपल्यावर बिनबुडाचे आरोप केले त्यांना संत मुक्ताईच शिक्षा देईल असही यावेळई खडसे म्हणाले.