शरद पवारांचे चरणस्पर्श केल्याने एकनाथ खडसे पुन्हा एकदा चर्चेत
गेल्या काही दिवसांपासून पक्षात घुसमट होत असलेले माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी जळगावात जैन हिल्सवर झालेल्या एका जाहीर कार्यक्रमाच्या व्यासपीठावर माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचे चरणस्पर्श करून आशिर्वाद घेतले.
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून पक्षात घुसमट होत असलेले माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी जळगावात जैन हिल्सवर झालेल्या एका जाहीर कार्यक्रमाच्या व्यासपीठावर माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचे चरणस्पर्श करून आशिर्वाद घेतले.
एकाच व्यासपीठावर नेते
जळगावात जैन इरिगेशनतर्फे दर दोन वर्षांनी दिल्या जाणाऱ्या आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च तंत्र पुरस्काराचे वितरण शरद पवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री सुरेश जैन उपस्थित होते.
एकनाथ खडसे पुन्हा चर्चेत
दरम्यान, याच व्यासपीठावरून दोन वर्षांपूर्वी महसूलमंत्री असताना खडसेंनी आपण शरद पवार यांचे चाहते असल्याचे विधान केले होते. मात्र यावेळी एकनाथ खडसे यांनी शरद पवारांचा चरणस्पर्श केल्याने पुन्हा एकदा खडसे चर्चेत आलेत.
कार्यक्रमानंतर शरद पवार आणि एकनाथ खडसे यांच्यात एकातांत 10 मिनिटं चर्चाही झाली. या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.