BMC Election: खरी शिवसेना (Shivsena) कोण? यासंबंधी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) नियमित सुनावणीला सुरुवात झाली असून यानिमित्ताने पुन्हा एकदा शिंदे आणि ठाकरे गट (Shinde vs Thackeray) आमने-सामने आला आहे. सुप्रीम कोर्ट तसंच निवडणूक आयोगाचा काय निकाल लागणार यावर दोन्ही गटांचं भवितव्य अवलंबून आहे. कारण नाव आणि चिन्ह गेल्यास आगामी निवडणुकांमधील रणनीतीही दोन्ही गटांना बदलावी लागणार आहे. मात्र शिवसेनेतेून बाहेर पडलेला शिंदे गट निवडणुका जाहीर होण्याआधीच तयारीला लागला आहे. मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने बैठकांचं सत्र सुरु केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास शिंदे गटाकडून सुरूवात झाली आहे. शिंदे गटाकडून गटप्रमुख ते विभागप्रमुखपदाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन मुंबईतील विभागांची चाचपणी केली जात आहे. या बैठकांमधील पदाधिकाऱ्यांना खासदार गजानन किर्तीकर, श्रीकांत शिंदे व संजय मोरे हे मार्गदर्शन करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. 


नुकतीच पश्चिम उपनगरातील दोन लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका संपन्न झाल्या आहेत. तर लवकरच दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, पूर्व उपनगरातील दोन लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट मुंबईत आता आपला पाय भक्कम करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.