मुंबई : Maharashtra political crisis : महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी  सरकारलाच आव्हान दिले आहे. त्याचवेळी पक्षनेतृत्वालाही दिलेय. एकाएकी नॉट रिचेबल होत राजकीय गणित वेगळ्याच टप्प्यावर नेले आहे. आता एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या थेट संपर्कात आहेत. दरम्यान, आता भाजपने खास खबरदारी घेत तिन नेत्यांवर शिंदे यांची जबाबदारी सोपवली आहे. (Eknath Shinde is in direct contact with Devendra Fadnavis)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेविरोधात बंडाचे निषाण फडकवणारे एकनाथ शिंदे यांची जबाबदारी फडणवीस यांचे खास जवळचे संजय कुटे, मनोज कंबोज , रवींद्र चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आली आहे, अशी माहिती 'झी 24 तास'ला मिळाली आहे. कंबोज, कुटे, चव्हाण फडणवीसांचे विश्वासू
आमदारांसह शिंदे थेट फडणवीसांच्या संपर्कात आहे, अशीही माहिती आहे.


'वेगळा गट हीच शिवसेना'


दरम्यान, आपला वेगळा गट हीच शिवसेना, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केलाय. स्वतःचा वेगळा गट स्थापन करण्याची एकनाथ शिंदे यांनी तयारी केलीय. आज दुपारीच शिंदे मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. स्वतःचा वेगळा गट स्थापन करून त्याची माहिती शिंदे राज्यपालांना देणार असल्याचं सूत्रांची माहिती आहे. शिवसेनेनं कालच शिंदेंना गटनेतेपदावरून हटवलं आहे. आता स्वतःचा गट हाच शिवसेना असल्याचं सांगत मोठा राजकीय भूकंप घडवण्याची शिंदे यांची तयारी असल्याचं समजतंय. 


एकनाथ शिंदे बंडाचा आज नवा अध्याय 


एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना बंडाचा आज नवा अध्याय सुरू झाला आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना रात्रीत गुजरातहून गुवाहाटीला नेण्यात आलंय. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातल्या भूकंपाचं केंद्र आता गुजरातमधून आसामच्या गुवाहाटीत गेलंय. शिवसेनेच्या गुजरातमधून आमदारांना रात्री तीन वाजता सूरतहून गुवाहाटीकडे नेण्यात आलंय. शिवसेना आमदारांसाठी २ चार्टर्ड प्लेन तैनात केली होती. एकनाथ शिंदे यांच्यासह सूरतहून आता शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीत दाखल झालेत. आपल्यासोबत शिवसेनेचे 40 आमदार सोबत असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडूही एकनाथ शिंदे यांच्यासह आहेत. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईही एकनाथ शिंदे यांच्यासह दाखल झाले आहेत.