मुंबई : Shiv Sena Crisis : शिवसेनेच्या आमदार - खासदारांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आता पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची मनधरणी करु लागले आहेत. शिवसेना संसदीय पक्षाचं बहुमत शिंदे यांच्याकडे झुकलं असले तरी पक्षातील प्राबल्य मात्र माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना पक्षातील 11 नेत्यांपैकी जास्तीत जास्त नेत्यांचे समर्थन मिळवून पक्षावरच वर्चस्व सांगण्याचा शिंदे यांचा प्रयत्न सुरू आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लिलाधर डाके आणि मनोहर जोशी यांची भेट घेत समर्थन मिळवण्याचे प्रयत्न शिंदे यांनी सुरु केले आहेत. त्याआधी शिंदे यांनी गजानन किर्तीकर यांची भेट घेत त्यांचीही मनधरणी केली आहे. 


एकनाथ शिंदे, रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची पक्षाने हकालपट्टी केली आहे. मात्र त्यानंतरही आपण शिवसेनेतच असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. आनंद अडसूळ आणि रामदास कदम यांनी मात्र पक्षातून हकालपट्टी होण्यापूर्वीच राजीनामा दिल्याने शिंदे गटाला त्यांचं समर्थन असलं तरी प्राबल्य दाखवण्यासाठी त्यांचा तांत्रिकदृष्ट्या उपयोग होणार नाही, अशी आता चर्चा आहे.