पुणे : Ajit Pawar on Eknath Shinde's criticism : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसीतील दसरा मेळाव्यात शिवसेनेवर टीका करताना राष्ट्रवादीवर हल्लाबोल चढवला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना राष्ट्रवादीकडे गहाण ठेवली, असा आरोप केला होता. दरम्यान, या राजकीय हेतूने केलेल्या आरोपात तथ्य नाही, असे प्रत्युत्तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार बारामती दौऱ्यावर आहेत. त्यांनी सकाळी सा वाजल्यापासून दौऱ्याला सुरुवात केली. बारामती शहर आणि परिसरातील विविध विकासकामांची पाहणी करत अधिकारी आणि कंत्राटदारांना सूचना केल्या. या दौऱ्यादरम्यान अजित पवार यांनी शिंदे गटाला प्रत्युत्तर दिले आहे. (NCP Leader Ajit Pawar Slams CM Eknath Shinde Speech At Bkc Dasara Melava)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाकरेंची शिवसेना राष्ट्रवादीकडे गहाण ठेवली, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रिमोटवर शिवसेना चालत होती, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यात केला होता. यावर अजित पवारांनी शिंदे यांना प्रत्युत्तर दिले आहे. शिंदे यांच्या आरोपात काही अर्थ नाही. आम्हाला अनेक वर्ष वेगवेगळे पक्षाला घेऊन सरकार चालवण्याचा अनुभव आहे. जे वक्तव्य केलंय, ते राजकीय हेतूने असल्याचा पलटवार अजित पवारांनी केला आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे नाव घेण्याचे टाळले. पण काहींची भाषणं नको इतकी लांबली. कोणाची ते तुम्ही ठरवा, असे अजित पवार यांनी म्हटले.  


मी दोघांची भाषणं ऐकली. पहिले उद्धव ठाकरे यांचे झाले आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंचं झाले. दोघांनी काय भाषणं केली हे सर्वांनी पाहिलं. यावर आम्ही जास्त टीका-टीपणी करण्याची गरज नाही. आम्ही मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम केलं. त्यांचे विचार होते. आणि ठाकरे मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री एकनाथ शिंदेंसोबतही काम करत होते, असे अजितदादा म्हणाले.


 आता महाराष्ट्रातील मतदारांनी आणि शिवसैनिकांनी निर्णय घ्यायचा आहे. कोणाच्या पाठिशी उभे राहायचं? मूळ शिवसेना पक्ष कोणाचा आहे?, याचा निर्णय जनतेने घ्यायचा आहे. ते आमच्या मंत्रिमंडळात होते, तेव्हा माझ्या उजव्या बाजूलाच बसायचे. पण तेव्हा झेंडा आमचा आणि अजेंडा राष्ट्रवादीचा ही भावना त्यांनी कधी बोलून दाखवली नाही, असे अजितदादा म्हणाले.