अहमदनगर : महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक उद्या 30 जून रोजी पार पडणार आहे. मात्र महापौर आणि उपमहापौर पदासाठी एक एकच अर्ज दाखल करण्यात आल्याने दोन्ही निवडीची औपचारिक घोषणा बाकी राहिली आहे. त्याची अधिकृतपणे उद्या महापालिकेच्या सभेत घोषणा केली जाणार जाईल. या निवडणुकीसाठी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली आहे. यात 23 नगरसेवक असलेल्या शिवसेनेला महापौरपद तर 18 नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला उपमहापौर पद देण्याचं ठरलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

67 जागा असलेल्या महानगरपालिकेत शिवसेना आणि राष्ट्रवादी च संख्याबळ मोठं आहे. त्यामुळे एक पेक्षा ज्यास्त उमेदवारी अर्ज दाखल झाले नाहीत.  राष्ट्रवादीच्या वतीने आज उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. उपमहापौर पदासाठी गणेश भोसले यांनी अर्ज दाखल केला. तर काल महापौर पदासाठी सेनेच्या रोहिणी शेंडगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. 


दोन्ही अर्ज दाखल करतांना महाविकास आघाडीचे नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. केवळ 5 नगरसेवकांच संख्याबळ असूनही महापौरपदासाठी सर्वांत आधी उमेदवार जाहीर केलेल्या काँग्रेसने या भूमिकेपासून माघार घेत उमेदवारी अर्जच दाखल केला नाही. तर महापौरपदाचा उमेदवार नसलेल्या भाजपने उपमहापौरपदासाठीही रस दाखविला नाही. 


अत्यल्प जागा असूनही केवळ चमत्काराच्या भरवशावर निवडणूक लढवण्यासाठी सज्ज असलेल्या काँग्रेसला शेवटच्या आपला निर्णय रद्द करावा लागला. आज निवड प्रक्रियेतील अर्ज दाखल करण्याचा कालावधी संपल्याने  आणि इतर कोणत्याही पक्षाचा अर्ज न आल्याने दोन्ही उमेदवारांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.